पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
मध्यप्रदेश, भोपाळ येथे झालेल्या खेलो इंडिया युथ ग्रेम्समधील कुस्ती स्पर्धेत पिंपरी-चिंचवडच्या प्रगती गायकवाड हिने उपांत्य फेरीत जागतिक स्पर्धेतील उत्तर प्रदेशच्या सविता दलाल हिला पराभूत करीत कांस्यपदक जिंकले.या यशस्वी कामगिरीबद्दल पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे यांनी अभिनंदन केले. या वेळी कार्याध्यक्ष आ. महेश लांडगे, उपाध्यक्ष विशाल कलाटे, सरचिटणीस संतोष माचुत्रे, दिलीप बालवडकर, हेमंत फुगे, किशोर नखाते, पंडीत मोकाशी, अजय लांडगे, ज्ञानेश्वर कुटे आदी उपस्थित होते.