पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मंगळवारी (दि. १४) सादर होणार आहे. प्रशासकांचा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. महापालिकेचा ४१ वा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पातून शहरवासियांना काय मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
अर्थसंकल्पासाठी १४ मार्च रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत आयुक्त शेखर सिंह हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
दरम्यान, गतवर्षी महापालिकेचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे एकूण ४ हजार ९६१ कोटी ६५ लाख व केंद्र शासन व राज्य शासनाच्या पुरस्कृत योजनेसह ६ हजार ४९७ कोटी २ लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यामध्ये यंदा वाढ होणार की घट होणार, तसेच महापालिका निवडणुकीपूर्वी शहरवासियांना नवीन काय मिळणार याबाबत उत्सुकता आहे.