निर्भीडसत्ता न्यूज –
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम ए रंगूनवाला इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आयोजित ‘एम ए रंगूनवाला बॅडमिंटन लीग २०१८ ‘ चे उदघाटन आज सोमवारी राज्य स्तरीय बॅडमिंटन पटू सुधांशु मेडसीकर यांच्या हस्ते झाले . प्राचार्य अनिता फ्रांत्झ यांनी स्वागत केले .
या स्पर्धेत एकूण पुण्यातील १२ संघानी भाग घेतला असून त्यात हॉटेल्स आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट चा समावेश आहे . ही स्पर्धा ९ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे . आझम कॅम्पस (पुणे कॅम्प ) येथे ही स्पर्धा सुरु राहणार असून ९ ऑगस्ट रोजी पारितोषिक वितरण होईल .