निर्भीडसत्ता न्युज –
भोसरीतील चक्रपाणी वसाहत व आळंदी रोड भागात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने स्वच्छता मोहिम राबवून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि धाडस ग्रुप यांच्या वतीवे ही मोहिम राबविण्यात आली.
परीसरात स्वच्छता मोहिम राबवून राडारोडा व कचरा उचलण्यात आला. तसेच, परिसरातील लोंकाना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कर्मचा-यांसह तरुणांनी सहभाग घेतला. करण पटेकर, सोऐल मळी, अभिषेक मसुरे यांनी संयोजन केले.