निर्भीडसत्ता न्यूज –
आमदार राम कदम यांनी मुलीसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर सर्वत्र टीकेची झोड उमटत आहे. दरम्यान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी सांस्कृतिक आणि शिक्षणमंत्री आहे. कारवाई करण्याचे माझ्या हातात नाही. जर राम कदम दोषी आढळल्यास गृह खाते त्यांच्यावर योग्य ती कारवाई करेल. असे वक्तव्य शिक्षणमंत्री तावडे यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही महिलांनी आज बुधवारी विनोद तावडे यांना राम कदम यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा घेराव घालून जाब विचारला.