निर्भीडसत्ता न्यूज –
शहर विद्रुपीकरणाच्या विरोधात ‘खिळेमुक्त झाड अभियान ‘ मार्फत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले .
‘माय अर्थ ‘ फाऊंडेशनचे संस्थापक अनंत घरत , ‘सिंहगड युवा फाऊंडेशन ‘चे मनीष जगदाळे, वृक्षप्राधिकरण माजी सदस्य किशोर राजपूत, शिवसेना विभागप्रमुख सुरज लोखंडे, युवराज पारीख, तानाजी लोहकरे, अनिकेत देशमुख, राजेश शेलार आणि पर्यावरण प्रेमी उपस्थित होते
व्यावसायिक आणि जाहिरातदार झाडांना खिळे, जाहिरात फलक ठोकून हानी पोहोचवतात आणि शहर विद्रुप करतात, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
झाडांना खिळे ठोकू नये असा कायदेशीर अधिनियम करावा ,अन्यथा आंदोलन करण्यात येईल ,असा इशारा देण्यात आला .