निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघाचे पदाधिकारी संदेश पुजारी यांचे वडील धोंडीराम श्रीकांत पुजारी (63 वर्षे) यांचे आज सोमवारी पहाटे सातारा येथे निधन झाले. कै. धोंडीराम श्रीकांत पुजारी हे सातारा रिमांड होम येथून अधीक्षक पदावरून निवृत्त झाले होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन विवाहित मुली, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांचा अंत्यविधी आज दुपारी 12 वाजता सातारा शहरातील माहुली स्मशानभूमी येथे होणार आहे.