निर्भीडसत्ता न्यूज –
सह्याद्री फाऊंडेशन व वीर वाद्यपथक भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामाजिक उपक्रम आज आयोजित करण्यात आला होता. च-होली परिसरातील इंद्रायणी नदी पात्रातील निर्माल्याचे एकत्रीकरण करून नदी पात्र प्रदूषण मुक्त करण्यात आले. संपूर्ण घाट स्वच्छ करण्यात आला.
सह्याद्री फाऊंडेशनचे प्रमुख मुंबई महापौर केसरी अजय लांडगे, तसेच वीर वाद्यपथकाचे प्रमुख मंगेश लांडे,स्वप्नील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हि स्वच्छता मोहीम करण्यात आली. त्यावेळी स्वप्नील भोसले मित्र परिवार व ग्रामस्थ, वीर वाद्यपथकाचे वादक याचे विशेष सहकार्य लाभले.