निर्भीड न्यूज –
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी औद्योगिकीकरणासह सांस्कृतिक व क्रीडा विषयक विकास होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार लक्ष्मण जगताप यांने केले.
पिंपळे गुरव येथील आदियाल स्पोर्टस् क्लबच्या पंधराव्या व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी (दि. 2 जून) आयोजित केलेल्या कार्यक्रमात आ. जगताप बोलत होते.
माजी नगरसेविका शोभा आदियाल, माजी नगरसेवक शंकर जगताप, गुरुमितसिंग आदियाल, महेंद्रसिंग आदियाल, अमरसिंग आदियाल, सुनिल निकम, नयन अहिरे, केशव मुरगुंडी, अरुण पवार, माऊली जगताप आदी उपस्थित होते.
पिंपळे गुरव येथिल गतिमंद व मतिमंद अनाथ मुलांच्या सोफोश धडफळे सेंटर मध्ये सकाळी माजी नगरसेविका शोभा आदियाल यांच्या हस्ते फळवाटप करण्यात आले. यावेळी करुणा सिस्टर, अल्फान्सा सिस्टर, महेंद्रसिंग आदियाल, अमरसिंग आदियाल आदी उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या हस्ते आदियाल स्पोर्टस् क्लबच्या सांस्कृतिक व क्रिडा विषयक उपक्रमांची माहिती देणा-या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
आ. जगताप पुढे म्हणाले की, शहरातील स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना व क्रिडाकौशल्याला संधी मिळाली पाहिजे त्यासाठी आदियाल स्पोर्टस् क्लब जे उपक्रम राबवित आहेत ते प्रशंसनीय आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने देखील कला, क्रीडा, सांस्कृतिक धोरणाअंतर्गत क्षेत्रीय स्तरावर उपक्रम राबविले पाहिजे व अशा संस्था संघटनांना प्रोत्साहन दिले पाहिजे. या वेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेल्या कलाकारांचा व स्थानिक स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळविलेल्या खेळाडूंचा आ. जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अमरसिंग आदियाल यांनी स्वागत केले. सुनील निकम यांनी सूत्रसंचालन केले. नयन अहिरे यांनी आभार मानले.