निर्भीडसत्ता न्यूज –
मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी सेवेत आरक्षण देणारे मराठा आरक्षणाचा कृती अहवाल(एटीआर) आज विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आला आहे. या अहवालातून मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात आले.
मराठा आरक्षणावरचा कृती अहवाल आज विधानसभेत सादर करण्यात आला असून ओबीसीला धक्का लावण्यात आलेला नाही. आरक्षण विधेयक मंजूर होण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेने आपल्या आमदारांना याआधीच व्हीप बजावला होता.
मराठा समाज आरक्षण विधेयक 2018 या विधेयकास विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसकडून एकमताने मंजूरी दिली आहे. त्यानंतर, अजित पवार यांनीही या विधेयकास एकमताने मंजूरी देत पाठिंबा देत असल्याचं म्हटले आहे. या विधेयकात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात. मराठा समाजाचा SEBC प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, धनगर आरक्षणासंदर्भातही लवकरच पावले उचलली जातील, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.