निर्भीडसत्ता न्यूज –
सध्याच्या काळात शेअरिंग तत्वावर वाहन उपभोक्त्यांची संख्या वाढत आहे. या वाढत्या बाजारपेठेत टाटा मोटर्सने पुण्यात टाटा टिगोर ईव्हीस सादर करण्यासाठी आज सेल्फ ड्राईव्हसाठी भाडेतत्वावर गाड्या देणा-या झूमकार बरोबर भागीदारी केली.
यासंदर्भात पुण्यात झालेल्या कार्यक्रमात इलेक्ट्रिक मोबिलिटी बिझनेस अड कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी अध्यक्ष शैलेश चंद्रा आणि झूमकारचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग मोरान यांनी बाणेरमधल्या टिगोर ईव्हीसच्या पहिल्या तुकडीला झेंडा दाखविला.
यावेळी बोलताना शैलेश चंद्रा म्हणाले, भविष्यात गतिशीलता ही जोडलेली, एकत्रित आणि शून्य उत्सर्जन तंत्रज्ञान क्षमता असणारी असेल. परिवर्तनाच्या या प्रवासाला टाटा मोटर्सही बांधील आहे. आणि ही यंत्रणा मजबूत करण्यासाठी सगळ्या समविचारी सहका-यांसोबत काम करत आहे. पुण्यातील नागरिकांसाठी शेअरिंग पातळीवर इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्युशन सादर करण्याकरिता झूमकारबरोबर भागीदारी करताना आम्हांला खूप आनंद होत आहे. पुणेकरांसाठी शून्य उत्सर्जन वाहतुक पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी झूमकारच्या सहकार्याने सेल्फ ड्राईव्ह रेंटल प्लॅटफॉर्मवर आता टाटा टिगोर ईव्हीस उपलब्ध आहे. आमच्या ग्राहकांक़डून आम्हांला पसंतीची पावती मिळेल आणि त्यांचा ड्रायव्हिंग अनुभव चांगला ठरेल, याची आम्हांला खात्री आहे.
या भागीदारीबद्दल बोलताना ग्रेर मोरान म्हणाले, पुण्यामध्ये इलेक्ट्रिक वाहने आणण्यासाठी झूमकार टिमला टाटा मोटर्स बरोबर भागीदारी करताना खूप आनंद होत आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातील क्रांतीकारी भागीदारीची ही सुरुवात ठरेल. आणि पुढील वर्षी टाटा कंपनीसोबत 20 शहरात 500 इलेक्ट्रिक वाहने सुरु करण्याची आम्हांला अपेक्षा आहे.
देशात इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देण्याशी टाटा मोटर्स बांधील आहे. आणि भारताच्या शाश्वत उज्वल भविष्याच्या बांधणीसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा गतिशील अंगिकार व्हावा म्हणून विविध भागीदारांसोबत सहकार्य करुन काम सुरु आहे.