निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी चिंचवडमध्ये शिक्षण, कला, क्रिडा, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरण या क्षेत्रात सामाजिक उपक्रम राबविणारी कर्तव्य फाऊंडेशन ही अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेच्या वतीने शहरातील युवक युवतींना सांस्कृतिक, कला व क्रिडा क्षेत्रात आपल्यातील गुण कौशल्य सादर करण्यासाठी ‘मोरया युथ फेस्टिव्हल’चे आयोजन राज्य लेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन यांनी केले आहे. त्याअंतर्गत होणा-या बुध्दीबळ आणि कॅरम स्पर्धा शुक्रवारी (दि. 4 जानेवारी 2019) गंधर्व हॉल, चापेकर चौक चिंचवड येथे होणार आहे. बुध्दीबळ स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना वुमन्स ग्रँड मास्टर स्वाती घाटे मार्गदर्शन करणार आहे. तसेच त्या एकाच वेळी चाळीस स्पर्धकांबरोबर बुध्दीबळ खेळणार आहेत. कॅरमचा वर्ल्ड चॅंम्पियन योगेश परदेशी तसेच 46 व्या राष्ट्रीय कॅरम स्पर्धेचा विजेता अभिजीत त्रिपणकर मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती ॲड. पटवर्धन यांनी दिली आहे.