निर्भीड न्यूज –
पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण मंडळाने शाळेच्या पहिल्याच दिवशी विध्यार्थ्यांना साहित्य देण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार रहाटणीतील कन्या शाळा क्र. पंचावन्न मध्ये शाळेतील विध्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले.
नगरसेवक शत्रुध्न काटे, शिक्षण मंडळाच्या माजी सभापती सविता खुळे, नगरसेवक कैलास थोपटे, नगरसेविका शितल काटे, सामाजिक कार्यकर्ते नरेश खुळे, निराधार योजना समितीचे अध्यक्ष गोपाळ माळेकर, दीपक जाधव, पोपट कापसे, भगवान गोडांबे, शाळेतील शिक्षक आदि या वेळी उपस्थित होते.
पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळांमधून दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षण मंडळाने मुलांना शालेय साहित्याचे वाटप या वेळी करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, वह्या, दप्तर, शालेय गणवेश, पिटी गणवेश, बूट, पायमोजे, रेनकोट, भुगोल पर्यावरण वही, कंपास पेटी, फूट पट्टी या साहित्याचे वाटप केले त्या वेळी विद्यार्थ्यांन मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.