निर्भीडसत्ता न्यूज-
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाने उपअभियंता अनिल राऊत यांना मारहाण झाल्याने निषेध सभा घेतली. त्या सभेत पालिकेतील एका अधिकार्याने नगरसेवकांना चोपून काढा, असे वक्तव्य केले. त्या मुजोर अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
उपअभियंता राऊत यांना मारहाण झाल्याबाबत पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर कर्मचारी महासंघाची निषेध सभा झाली. त्या सभेत पालिकेच्या एका अधिकार्याने नगरसेवकांना चोपून काढा, असे वक्तव्य केले आहे. या मुजोर अधिकार्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्याकडे देण्यात आले.
विरोधी पक्षनेते दत्ता साने, मनसेचे गटनेते सचिन चिखले, अपक्ष गटनेते कैलास बारणे, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, संदीप वाघेरे, नवनाथ जगताप, शाम लांडे, रोहित काटे, शाम लांडे, प्रवीण भालेकर, राजू मिसाळ, उत्तम केंदळे, पंकज भालेकर, अमित गावडे, सचिन भोसले, शैलेश मोरे, राजू बनसोडे, संदीप कस्पटे, विक्रांत लांडे, नीलेश बारणे, नगरसेविका पौंर्णिमा सोनवणे, मीनल यादव, रेखा दर्शले, अश्विनी वाघमारे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे आदी यावेळी उपस्थित होते.
Attachments area