निर्भीड न्यूज –
शहरातील वाढत्या गुन्हेगारीविरोधात पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हे आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात उपमहापौर प्रभाकर वाघेरे, सभागृहनेत्या मंगला कदम, नगरसेविका झामाबाई बारणे, नगरसेवक कैलास थोपटे, नगरसेवक राजू मिसाळ, उल्हास शेट्टी, निलेश पांढरकर, माजी नगरसेविका सुरेखा लांडगे, नाना काटे, राष्ट्रवादी युवती संघटक वर्षा जगताप, निहाल पानसरे, संदीप बेलसरे, विजय लांडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती फजल शेख, सेवा दलाचे शहराध्यक्ष आनंदा यादव, विक्रम पवार आदी सहभागी झाले होते.
शहरात गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः रस्त्याच्याकडेला लावण्यात आलेल्या वाहनांचे तोडफोड करण्याचे सत्र थांबत नसल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. तसेच घरफोडी आणि चोऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. या वाढत्या गुन्हेगारीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस गुरूवारी रस्त्यावर उतरली.