निर्भीडसत्ता न्यूज –
शहरातील विविध विकासकामांच्या एकूण 81 कोटी 17 लाख 44 हजार खर्चाच्या कामांना स्थायी समितीने गुरूवारी (दि.21) मंजुरी दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. प्रभाग क्रमांक 26 मधील छत्रपती चौक उत्कर्ष चौकापर्यंत कॉक्रीट रस्त्यासाठी 16 कोटी, रावेतमधील रेल्वे उड्डाणपुलालगत सेवा रस्ता विकसित करण्यासाठी 4 कोटी 81 लाख खर्चाला मान्यता देण्यात आली.
दिघीतील संरक्षण विभागाच्या बॉम्बे इंजिनिअरींग गु्रपच्या (बी.ई.जी.) आवारात दघी एकूण 35 हजार झाडे लावण्या येणार आहेत. त्याची 3 वर्षे देखभाल व संवर्धन केले जाणार आहे. प्रति रोपासाठी 930 रूपये खर्च आहे. हे काम महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाकडून करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी 3 कोटी 25 लाख 50 हजार रुपये खर्चास समितीने मान्यता दिली, अशी माहिती सदस्य विलास मडिगेरी यांनी दिली.
काळेवाडी फाटा येथे व वाकड कस्पटेवस्ती ते पिंपरी-काळेवाडी ग्रेडसेपरेटर बांधण्यासाठी विद्युत विषयक कामासाठी 1 कोटी 86 हजार खर्चास मान्यता देण्यात आली. पिंपळे गुरव येथील सुदर्शननगर चौक ग्रेडसेपरेटर बांधण्यासाठी विद्युत विषयक कामासाठी 1 कोटी 28 लाख, चिंचवड चापेकर चौकात पादचार्यांसाठी भुयारी मार्ग विकसित करण्यासाठी 1 कोटी 40 लाख खर्चास मान्यता देण्यात आली.
चिखलीतील रस्ते डांबरीकरणासाठी 4 कोटील, भाटनगर येथील रस्त्यासाठी 3 कोटी 19 लाख, मोशीतील रस्त्यासाठी 3 कोटी 47 लाख, प्रभाग 13 मधील रस्त्यासाठी 1 कोटी 66 लाख, पुर्णानगर रस्त्यासाठी 1 कोटी 85 लाख खर्चाला ऐनवेळी मान्यता देण्यात आली. तसेच, पंतप्रधान आवास योजनेतील गृहप्रकल्पाची रेरा कायद्याअंतर्गत नोंदणी केली जाणार आहे. त्यासाठी ग्लिट एड्ज या सल्लागार एजन्सीला प्रति प्रकल्पासाठी 4 लाख 40 हजार रूपये अदा करण्यास आयत्यावेळी मंजुरी देण्यात आली.
दवाखाना व रुग्णालय विभागांकरिता आवश्यक 238 नग संगणक संच खरेदीसाठी 1 कोटी 15 लाख खर्चास मान्यता देण्यात आली. वाकड-पिंपळे निलखमधील विविध आरक्षणे विकसित करण्यासाठी 1 कोटी 32 लाख मान्यता देण्यात आली. देहू-आळंदी रस्त्यालगत परिसरातील रस्ते विकसित करण्यासाठी 1 कोटी 55 लाख आणि बोर्हाडेवाडी बनकरवस्तीमधील रस्ते विकसित करण्यासाठी 1 कोटी 52 लाख खर्चास मान्यता देण्यात आली. उद्याने आणि शाळांमधील खेळणीचे स्पेअर पार्ट पुरविणे व बसविण्यासाठी 3 कोटी खर्चास मान्यता देण्यात आली.