निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम /अतिक्रमण नियंत्रण व निर्मुलन विभागाने पिंपळे गुरव येथील पवना नदी पात्रातील महादेव मंदिराचे अनधिकृत बांधकाम गुरूवारी (दि.21) जमीनदोस्त केले. सदर मंदिराचे सभामंडप कोसळून 3 मजुराचा मृत्यू झाल्याने झालेल्या टीकेमुळे पालिकेने ही कारवाई केली गेली.
गुरूवारी दुपारी अडीचच्या सुमारास करण्यात आली. साठ फुटी रस्त्याकडेच्या पवना नदीपात्रात महादेव मंदिराचा जिर्णोद्धाराचे काम नोव्हेबर 2018 पासून सुरू करण्यात आले होते. जुन्या मंदिराच्या मागील बाजूस अनधिकृतपणे हे दगडी बांधकाम करण्यात येत होते. मंदिराचे दगडी बांधकाम पूर्ण होऊन त्या समोरील व बहुतालचे दगडी सभामंडपाचे काम सुरू होते. सदर सभामंडपाचे बांधकाम बुधवारी (दि.20) दुपारी अचानक कोसळले. त्यात 3 निष्पाप मजुराचा नाहक मृत्यू झाला. तर, 6 मजूर जखमी झाले आहेत.
त्या अनधिकृत बांधकामास पालिकेने 16 नोव्हेंबर 2018ला नोटीस दिली होती. सदर बांधकाम स्वत:हून 24 तासाच्या आत काढून घेण्याचे नोटीशीत बजावले होते. पालिकेनेही तब्बल 3 महिने त्या बांधकामाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे झालेल्या दुर्घटनेत 3 मजुरांचा बळी गेला आणि 6 मजुर जखमी झाले आहे. केवळ राजकीय दबावामुळे त्याकडे दुर्लक्ष झाल्याची टीका शहरभरातून झाली. त्या नंतर खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने दुसर्या दिवशी गुरूवारी या 132 चौरस फुट क्षेत्रफळातील नदी पात्रातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करीत ते जमीनदोस्त केले. पोलिस बंदोबस्तात ही कारवाई केली गेली, अशी माहिती सहशहर अभियंता राजन पाटील यांनी दिली.
दरम्यान, सदर मंदिराचे बांधकामाचे सभामंडप कोसळून 3 मजुरांचा मृत्यू झाला. पालिकेने राजकीय दबावामुळे पालिकेने 3 महिने त्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली नाही. याला जबाबदार असलेल्या पालिकेच्या दोषी अधिकार्यांवर कारवाई करावी. त्याच्यावर सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.