निर्भीडसत्ता न्यूज –
सालाबादप्रमाणे यावर्षीही डॉ. आंबेडकर, भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात येणार आहे. दिवंगत माजी खासदार जी के माने सोशल फौंडेशनच्या माध्यमातून तसेच पंचशील नगर मित्र मंडळाच्या पुढाकाराने जयंती सोहळ्याचे आयोजन केले आहे. शुक्रवार (दि19) रोजी पंचशीलनगर, कुसुंबी येथे जयंती सोहळा होणार आहे.
सकाळी 8 वाजता बुद्ध विहारात सामुदायिक बुद्ध वंदना होणार आहे. त्याचबरोबर त्रिशरण, पंचशील पठण होईल.
दुपारी 12 वाजता चित्रकला, रंगभरण स्पर्धा होणार आहे. त्यानंतर 2 वाजता खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम होईल.
दरम्यान, कार्यक्रमाचे सूत्रसंवादक बाजी मालिकेतील अभिनेते संदीप साकोरे असतील. सायंकाळी 4 वाजता राष्ट्र पुरुषांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यावर्षी दिवंगत खासदार जी के माने यांचे चिरंजीव प्रकाशदादा व कुटुंबीय आपल्याबरोबर सहभागी होणार आहेत.ज्येष्ठ विधिज्ञ सुनील माने, प्रभाकर कंबळे, ज्येष्ठ पत्रकार संजय माने, उद्योजक सुरेश दादा माने, सेल्स टॅक्स अधिकारी उमेश माने आदी उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी दिवंगत खासदार जी के माने यांचा जीवनपट चित्रफितीद्वारे दाखविण्यात येईल. तसेच रात्री बुद्ध,भीम गीतांचा कार्यक्रम होईल.