मुंबई | निर्भीडसत्ता न्यूज
आंबेडकरी चळवळीतील महत्त्वाचे नेते, दलित पँथरचे एक संस्थापक, ज्येष्ठ विचारवंत, बौद्ध साहित्याचे गाढे अभ्यासक आणि लेखक राजा ढाले यांचे मुंबईत अल्पशा आजाराने निधन झाले आहे. आज सकाळी त्यांच्या विक्रोळीतील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालावली. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पार्थिवावर मुंबईत बुधवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. ढाले यांच्या जाण्याने दलित चळवळ, बौद्ध साहित्यविश्व, आणि आंबेडकरी विचार चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना, चळवळीतील कार्यकर्ते आणि साहित्यक्षेत्रात व्यक्त होत आहे.