निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नगरसेवक तीव्र इच्छुक आहेत. विरोधी पक्षनेतेपदाचे नाव गुरूवारी (दि.18) पक्षाच्या मेळाव्यात होणार्या आढावा बैठकीत निश्चित केले जाण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुकीच्या पंचवार्षिकमध्ये प्रत्येकी वर्षी एका या प्रमाणे 5 नगरसेवकाला संधी मिळावी म्हणून पक्षाचे नेते अजित पवार यांनी दरवर्षी एका नगरसेवकाला विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार वर्षाची मुदत संपल्याने विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी मंगळवारी (दि.9) महापौर राहुल जाधव व पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याकडे राजीनामा दिला.
या मानाच्या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नगरसेवक इच्छुक आहे. त्यात नाना काटे, जावेद शेख, राजू मिसाळ, वैशाली घोडेकर यांची नावे चर्चेत आहेत. सर्व पदाधिकार्यांशी चर्चा करून अजित पवार येत्या गुरूवारी होणार्या पक्षाच्या मेळाव्यात विरोधी पक्षनेत्याचे नाव जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या पदासाठी राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक तीव्र इच्छुक आहेत. त्यासाठी अजित पवार यांच्याकडे मोर्चे बांधणी केली जात आहे. तसेच, विविध प्रकारे शिफारसचे तंत्र अंवलबले जात आहे.
दरम्यान, या पदासाठी राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक तीव्र इच्छुक आहेत. त्यासाठी अजित पवार यांच्याकडे मोर्चे बांधणी केली जात आहे. तसेच, विविध प्रकारे शिफारसचे तंत्र अंवलबले जात आहे.