निर्भीडसत्ता न्यूज –
माजी उपमुख्यमंत्री अजित पवारयांच्या वाढदिवसानिमित्त रावेत प्राधिकरणातील आठवडे बाजाराच्या मैदान तसेच परिसरात राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्या हस्ते सोमवारी (दि. २२) कडूनिंब, पिंपळ, वड या वृक्षांचे रोपण करण्यात आले.
यावेळी आर. आर. शिंदे, एच. आर. ठाकूर, अण्णादेशपांडे, किसनराव बंड, अॅड. सोमनाथ हरपुडे, समीर चौधरी, बाबा पाटील, पवन खटावणे, प्रभूकांगणे, ज्ञानदेव माने, किशोर चौधरी, विठ्ठलकांबळे, डॉ. रमेश शेटे, प्रकाश जगताप, शिवाजीकुंभार, गंगाराम नेवसे, रमेश माने, भूपाल बसनवार, नीलम शिंदे यांच्यासह माऊली ज्येष्ठ नागरिक संघ, तिर्थस्वरूप ज्येष्ठ नागरिक संघ, गुरुद्वारा ज्येष्ठनागरिक संघाचे पदाधिकारी आणि सदस्य तसेचविविध सोसायट्यांचे चेअरमन व नागरिक उपस्थितहोते.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकानेवृक्षारोपण करायला हवे. शुद्ध हवा, मुबलक पाणीमिळविण्यासाठी तसेच जमिनीची धूप होऊ नयेयासाठी झाडांची मोठी मदत होते. तसेच प्रत्येकझाडाचा औषधी उपयोग आहे. म्हणून बहुपयोगीझाडांची लागवड करायला हवी, असे मोरेश्वरभोंडवे म्हणाले. आपणच आपले पर्यावरणसांभाळायला हवे या उद्देशानेअजित पवार यांच्यावाढदिवसानिमित्त रावेत परिसरात पाच हजारझाडांचे वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन करण्याचीजबाबदारी ज्येष्ठ नागरिक संघ आणि मोरेश्वरभोंडवे मित्र परिवाराने घेतली आहे.