निर्भीडसत्ता न्यूज –
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.त्यानंतर,राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून उदयनराजेंवर जोरदार टीका होत आहे.दरम्यान साताऱ्यातून राष्ट्रवादीचा उमेदवार कोण?याची उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान,शरद पवार स्वतः साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवू शकतात,अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.दरम्यान आज उदयनराजेंनी सातारा येथे पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी,त्यांना याबद्दल विचारण्यात आले.
दरम्यान,यानंतर पत्रकारांशी बोलताना उदयनराजे भावूक झाले.त्यांच्या डोळ्यातून पाणी आले.ते म्हणाले,”पवार साहेब वडीलधारे आहेत.ते काल पण आदरणीय होते,आज पण आहेत,उद्या पण असतील.त्यांच्या विरोधात मी कशी निवडणूक लढवेन.ते उभे राहिले तर मी फॉर्म भरणार नाही.पण पवार साहेबांनी फक्त दिल्लीतील बंगला आणि गाडी वापरण्याची मुभा द्यावी.”