निर्भीडसत्ता न्यूज –
हितेश राघवजी रावरिया (वय ३०) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी रामजी महादेव पटेल (वय ४२, रा. लेकटाऊन सोसायटी, बिबवेवाडी) यांच्यासह साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. कोढवा भागातील गोकुळनगर परिसरात भाविका बायोकेम नावाच्या गोदामात बनावट सौंदर्यप्रसाधने तसेच दैनंदिन वापरातील वस्तूंचा साठा करून ठेवला असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट तीनमधील पोलीस हवालदार संतोष क्षीरसागर आणि अतुल साठे यांना मिळाली.
बनावट सौंदर्यप्रसाधनांसह घरगुती वापराच्या वस्तूंची निर्मिती करणाऱ्या व्यापाऱ्याच्या कोंढव्यातील गोदामावर गुन्हे शाखेने छापा टाकला. या कारवाईत बनावट सौंदर्यप्रसाधने तसेच दैनंदिन वापरातील वस्तू असा १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एका व्यापाऱ्याला अटक करण्यात आली असून तो मूळचा गुजरातचा आहे.