निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांच्यावर विश्वास दाखविला आहे. त्यांना पक्षाने पुन्हा दुसर्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे.त्यामुळे पिंपरी मतदार संघात सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
मुंबईतील मातोश्री येथे शिवसेनेच्या सर्व विद्यमान आमदारांना पक्षप्रमुख अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी ए. बी. फॉर्मचे वितरण केले. उद्धव ठाकरे यांनी आमदार चाबुकस्वार यांना ए.बी. फॉर्म हातात देत ‘पक्ष तुमच्या पाठिशी आहे, कामाला लागा, निवडूण या’ असे म्हणत शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, गेले काही दिवस पिंपरी हा राखीव मतदारसंघ शिवसेनेला मिळेल की भाजपला असे वातावरण होते. गेल्या सन 2014 ला भाजपने ती जागा मित्रपक्ष आरपीआयला (आठवले गट) सोडली होती. या पार्श्वभूमीवर आरपीआयने पिंपरीच्या जागेसाठी जोरदार प्रयत्न चालविले होते. तसेच शिवसेनेच्या एका विद्यमान नगरसेवकाने देखील पिंपरीच्या तिकीटासाठी देव पाण्यात ठेवले होते.