निर्भीडसत्ता न्यूज –
-एकूण साडेपाच कोटींची मालमत्ता
-उच्चशिक्षित असूनही गुन्हा दाखल
पिंपरी विधानसभा मतदार संघातील महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार विद्यमान आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, त्यांची पत्नी सध्या व मुलगा सुमेध यांची एकत्रित स्थावर व जंगम मालमत्ता एकूण 5 कोटी 39 लाख 28 हजार 949 रूपये मुल्याची आहे. त्याच्याकडे रोख केवळ 10 हजारांची रक्कम आहे. गेल्या 2014 च्या निवडणुकीत त्याची एकूण मालमत्ता 1 कोटी 62 लाख 25 हजार इतकी होती. त्यात पाच वर्षात 3 कोटी 77 लाख 3 हजार 949 ने वाढ झाल्याने दिसत आहे. ते उच्च शिक्षित असलेले तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.
चाबुकस्वार यांनी गुरूवारी (दि.3) उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यानुसार ही माहिती समोर आली आहे. चाबुकस्वार यांच्या नावाने असलेल्या एकूण स्थूल मालमत्तेचे मूल्य 23 लाख 48 हजार 880 आणि पत्नीकडे 15 लाख 80 हजार 69 रूपये आहे.
त्याची 2016 ला टायोटा कार घेतली असून, त्याची किंमत 22 लाख 65हजार 158 आहे. तर, पत्नीच्या नावाने सन 2017 ला घेतलेल्या हुंडाई कारची किंमत 11 लाख 71 हजार 728 रूपये आहे. चाबुकस्वार यांच्याकडे केवळ 5 ग्रॅम सोने तर, पत्नीकडे 100 ग्रॅम सोन्यांची दागिणे आहेत. त्याच्याकडे केवळ 10 हजार तर, पत्नीकडे केवळ 2 हजारांची रोकड आहे.
त्याच्या नावावर शेतजमीन व बिगरशेत जमीन नाही. मुलाच्या सुमेध याच्या नावे शास्त्रीनगर येथे 3,420 चौरस फुट आकाराचा व्यापारी गाळा आहे. त्याचे मूल्य अडीच कोटी आहे. चाबुकस्वार यांच्या नावाने पिंपरीत 3,012 चौरस फूटाची निवासी इमारत आहे. त्याचे मूल्य अडीच कोटी आहे. त्याच्यावर 6 लाख 20 हजार 233 रूपयांचे आणि पत्नीच्या नावे 3 लाख 39 हजार 674 रूपयांचे बँकेचे कर्ज आहे.
साठ वर्षीय चाबुकस्वार त्याच्यावर 295, 34 कलमानुसार धर्मासंबंधित एकत्रित अपराध हा सन2013 चा गुन्हा दाखल आहे. चाबुकस्वार हे बी. कॉम., एम.ए., एल.एल.बी., एम.फील. असे उच्च शिक्षित आहेत. त्याचे शिक्षण नेस वाडिया, सिम्बायसेस आणि पुणे विद्यापीठ येथे झाले आहे.