निर्भीडसत्ता न्यूज ।
चिंचवड महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समिती त्रिवेंद्रम येथे आयोजित प्रशिक्षण वर्गात सहभागी होणार आहे. हा प्रशिक्षण वर्ग 23 व 24 डिसेंबरला आहे. त्यासाठी 1 लाख 40 हजार रूपये खर्च अपेक्षित आहे.
समितीची गुरूवारी (दि.28) सभा झाली. अध्यक्षस्थानी समिती सभापती निर्मला कुटे होेत्या. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे या प्रशिक्षणाचे वर्गाचे आयोजन केले आहे. त्यात समितीचे 10 जणांचे पथक सहभागी होणार आहे.
दौर्यात समितीच्या सभापती कुटे, सदस्या भिमाबाई फुगे, अनुराधा गोफणे, उषा मुंढे, सुजाता पालांडे, साधना मळेकर, सुमन पवळे, निकीता कदम, अश्विनी चिंचवडे व लिपिक शुभांगी चव्हाण सहभागी होणार आहे. त्या दौर्यास प्रत्येक 14 हजार रूपये असे एकूण 1 लाख 40 हजार खर्च आहे. या निर्णयास समितीने मंजुरी दिली आहे.