निर्भीडसत्ता न्यूज ।
चिंचवड शहरातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू व साहित्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दरवर्षी पवनाथडी जत्रा आयोजित केली जाते. यंदा ती जानेवारी महिन्यात आयोजित केली जाणार आहे.
महिला व बाल कल्याण समितीची सभा गुरूवारी (दि.28) झाली. अध्यक्षस्थानी निर्मला कुटे होत्या. त्या सभेत जानेवारीच्या पहिला किंवा दुसर्या आठवड्यात पवनाथडी जत्रा आयोजित करण्याचा ऐनवेळी निर्णय घेण्यात आला.
जत्रा जानेवारीच्या सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदान येथे किंवा पिंपरीतील एच. ए. मैदान येथे आयोजित करण्यात येणार आहे. या दोन्हीपैकी एक ठिकाण लवकरच निश्चित केले जाणार आहे. पवनाथडी जत्रेचे आयोजन नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने केले जाते.