निर्भीडसत्ता न्यूज –
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या मंत्रिमडळविस्तारामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मुंबईच्या राजभवनामध्ये ठाकरे सरकारचा मंत्रिमडळ विस्तार होत आहे.
अजित पवारांनी सव्वा महिन्यामध्ये आज दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांनी तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या महिन्यामध्ये मुख्यमंत्रिपदाची तसेच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
महाविकास आघाडीचा आज मंत्रिमंडळ विस्तार होत असून एकूण 36 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. काँग्रेसचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे 13 आणि शिवसेनेचे 13 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेतील. उपमुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीकडून दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, जितेंद्र आव्हाड हे मंत्रिमंदाची शपथ घेणार आहेत.