निर्भीड सत्ता न्यूज
अमेरिकेच्या हल्ल्यात इराणने लष्करी अधिकारी कासीम सुलेमानी ठार झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेतल्यास त्या देशांतील ५२ ठिकाणांवर हल्ला करण्यात येईल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
इराणचे मेजर जनरल सुलेमानी हे शुक्रवारी सकाळी बगदाद विमानतळाजवळ अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात ठार झाले. यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढला आहे. सुलेमान यांच्या हत्येचा बदला घेण्याचा निर्धार इराणने जाहीर केला. त्यावर ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका घेतली. अमेरिकेने इराणमधील ५२ ठिकाणे निश्चित केली आहेत. या ठिकाणांवर हल्ला करण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला.