निर्भीड सत्ता न्यूज
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापाैर उषा ढोरे यांच्या निवडीनंतर पहिल्यादांच महासभेला आज (सोमवारी) सामोरे गेल्या. शहरातील भू-संपादन खाजगी वाटाघाटी प्रस्तावावरुन सभागृहात गोंधळ झाला. शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांनी मानदंड धरताच महापाैर सभेचे कामकाज तहकूब करीत सभागृहातून बाहेर पडल्या. त्यामुळे राष्ट्रगीत न करताच महासभेचे कामकाज तहकूब केले. यावरुन महापाैरांनी राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
महापालिकेची डिसेंबर महिन्यांची तहकूब सभा आज (सोमवारी) घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापाैर उषा ढोरे होत्या. या सभेच्या विषयपत्रिकेवर खासगी वाटाघाटीद्वारे भू-संपादन करताना नुकसान भरपाई देण्याचे धोरण 2013 मध्ये महापालिकेने निश्चित केले आहे. त्या धोरणात पुन्हा बदल करण्यात येत आहेत. यावरुनच भाजप नगरसेवकांमध्ये दोन गट पडले आहेत.
भाजपच्या पक्षाच्या बैठकीत विषय तहकूब ठरले होते. त्यामुळे नगरसेवक सागर अंगोळकर यांनी खासगी वाटाघाटीद्वारे भू-संपादनाचा विषय वाचला. त्याला अंबरनाथ कांबळे यांनी अनुमोदन देताच महापौर ढोरे यांनी हा विषय तहकूब केल्याचे सांगितले. तहकुबीला आक्षेप घेत भाजप नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी महापौरांसमोर धाव घेतली. राजदंड पळविण्याचा प्रयत्न केल्या. त्यानंतर कोणतीही सूचना आणि अनुमोदन नसताना महापौरांनी महासभा तहकूब करुन त्या आसनावरुन उठून गेल्या.