निर्भीड सत्ता न्यूज
पिंपरी चिंचवड महापालिकेत महापाैर विरोधकांना कोणत्याच विषयावर बोलू देत तर नाहीतच पण, त्यांच्याही नगरसेवकांना बोलण्यास मनाई चालविलेली आहे. त्यामुळे सभेचे कामकाज नियमाने न चालविता हुकूमशाहीने पध्दतीने चालविले जात आहे. भाजपची ही हुकूमशाही खपवून घेणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
महापालिकेचे डिसेंबर महिन्याची तहकूब सभा आज (सोमवारी) घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापाैर उषा ढोरे होत्या. या सभेतील विषयपत्रिकेवर खाजगी वाटाघाटीने भू-संपादन करताना नुकसान भरपाई देण्याचे धोरण 2013 मध्ये महापालिकेने निश्चित केले आहे. त्या धोरणात पुन्हा बदल करण्यात येत आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील स्थानिक नागरिक-शेतक-यांच्या निगडीत हा प्रस्ताव आहे. मात्र, त्या विषयावर कोणाला बोलू न देता तहकूब ठेवण्यात आलेला आहे. आम्हाला आणि काही भाजप नगरसेवकांना देखील बोलायचे होते. परंतू, महापालिकेचे कामकाज नियमबाह्य चालवून विषय वाचताच त्याला तहकूब करण्यात आलेला आहे. त्यामुळे भाजपची ही हुकूमशाही यापुढे खपवून घेणार नाही, असेही त्यांनी म्हटले