निर्भीड न्यूज –
‘सोन्याचा शर्ट’ फेम चर्चित असलेल्या भोसरीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका सिमा फुगे यांचे पती ‘गोल्डन मॅन’ दत्ता फुगे यांचा बारा जणांच्या टोळक्याने धारदार हत्यारे, दगडाने ठेचून फुगे यांचा निर्घृण खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच दगडाने ठेचून निर्घृण खून केला.याप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली असून, मुख्य सूत्रधारासह सातजण पसार झाले आहेत.
अमोल ऊर्फ बल्ली कैलास पठारे वय 24, रा. आळंदी रोड, शैलेश सूर्यकांत वाळके वय 26, रा. यमाईनगर, दिघी, विशाल दत्ता पारखे वय 32, रा. विश्रांतवाडी, पुणे, निवृत्ती उर्फ बाळू किसन वाळके वय 45, रा. गांधी चौक, दिघी, प्रेम उर्फ कक्का उर्फ प्रमोद संताराम ढोलपुरीया वय 23, रा. रामनगर, बोपखेल अशी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींची नावे आहेत.
या खुनाचा मुख्य आरोपी अतुल मोहिते (वय 31, रा. भारतमाता नगर, दिघी हा आहे. त्याच्यासह बाबू वाळके व इतर पाच साथीदार पसार झाले आहेत. याप्रकरणी दत्ता फुगे यांचा मुलगा शुभम दत्तात्रय फुगे वय 21, रा. शीतलबाग, भोसरी याने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ‘गोल्डन मॅन’ दत्ता फुगे यांचे वक्रतुंड चिटफंड, शुभम फायनान्स या नावाने फर्म आहेत. आरोपी आणि दत्ता फुगे हे एकमेकांच्या ओळखीचे होते. त्यांच्यात पैशांची देवाणघेवाण झाली होती. त्यातून अतुल मोहिते याने गुरुवारी दि. 14 रात्री साडे अकराच्या सुमारास फुगे यांना वाढदिवसाचे निमित्त करुन दिघीत बोलावून घेतले.
दिघीतील भारतमातानगर येथे गेल्यानंतर फुगे यांना अतुल मोहिते याचे अकरा साथीदारांनी कोयते, सत्तूर, तलवार अश्या धारदार हत्या-याने वार केले. तसेच दगडाने ठेचून त्यांचा निर्घृण खून केला. पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. मात्र, मुख्य आरोपी अतुल मोहितेसह सात जण पसार झाले आहेत.