निर्भीड न्यूज –
रहाटणी येथील नालंदा हौसिंग सोसायटीतील गेल्या २० वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचे काम मार्गी लावल्याबद्दल आमदार लक्ष्मण जगताप यांचा भारतीय राज्यघटनेची प्रत देऊन रहाटणीतील आनंद बुद्ध विहारात सत्कार करण्यात आला.
बुद्ध विहाराचे अध्यक्ष महादेव कांबळे, बाबा त्रिभुवन, नगरसेवक शत्रुघ्न काटे, भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर, शिक्षण मंडळाचे सभापती चेतन भुजबळ, अनिल नखाते, पोपट कदम, दिपक जाधव, अक्षय बाराथे तसेच आनंद मित्र मंडळाचे सर्व सभासद व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.