पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
जागतिक महिला दिनानिमित्त अखिल संत तुकारामनगर महिला प्रतिष्ठानतर्फे ‘स्त्री शक्तीचा आनंदोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे, पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिरात रविवारी (दि.8) दुपारी 3 ते 10 पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. अखिल संत तुकारामनगर महिला प्रतिष्ठानचा 15 वा वर्धापन दिनी देखील वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले आहेत, अशी माहिती नगरसेविका सुजाता पालांडे यांनी दिली.
तसेच प्रेरणादायी महिलांचा स्त्री शक्ती सन्मान सत्कार सोहळा आयोजित केला आहे. त्यामध्ये निगडी येथील महिला रिक्षा स्टॅण्ड सदस्याचा सत्कार, महात्मा फुले नगरमधील साफसफाई कर्मचा-यांना स्वच्छतादूत पुरस्कार, चित्रपट सृष्टी पर्दापण केलेल्या मुलींचा सन्मान, महिलांसाठी विविध प्रश्न मंजूषा कार्यक्रम, महिलांसाठी खास संस्कृती महाराष्ट्राची लावणीचा कार्यक्रम घेण्यात आले आहेत. महिलांच्या स्पर्धेत सहभागी होणा-या महिलांना विविध आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार आहे. तरी संत तुकारामनगर प्रभाग क्रमांक 20 मधील सर्व महिलांनी या कार्यक्रमाचा आ