पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
लॉकडाऊनमुळे शहरातील बेघर, निराधार, स्थलांतरित मजुर व गोरगरीब, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांचे अन्नावाचून हाल होत आहेत. त्या गोरगरीब नागरिकांसाठी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांच्या वतीने दररोज अन्न वितरण केले जात आहे. निगडीतील टिळक चौकात दररोज दोन वेळचे भोजन वाटप केले जात असून, त्याचा लाभ सुमारे 400 जण घेत आहेत.
सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. निगडीतील बस थांबा येथे सकाळी 11 ते दुपारी 2 आणि संध्याकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत भोजनाचे वाटप केले जात आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवून अन्नाचे वाटप केले जात आहे. तसेच, सफाई कामगार, पोलिस, होमगार्ड आदींच्या जेवणाची सोयही करण्यात आली आहे. प्राधिकरण पोलिस चौकीला दररोज भोजन दिले जात आहे. तसेच, चौकीजवळील झोपडपट्टी आणि ओटास्किम येथील अंध कुटुंबांना दररोज भोजन नेऊन दिले जात आहे.
किरण काळभोर यांच्या स्मरणार्थ आयोजित या उपक्रमात सचिन शिंदे, स्वप्निल पवार, बंडू जोशी, देवाराम चौधरी, फुलाराम चौधरी, रमेश वाघमारे, रमेश पुरोहित, सुनील आगरवाल, सत्तार शेख याचे सहकार्य लाभले आहे. लॉकडाऊन संपेपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार असून, गरजू नागरिकांनी भोजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सचिन काळभोर यांनी केले आहे.
लॉकडाऊन घोषित झाल्यापासून काळभोर यांच्या वतीने हा उपक्रम राबविला जात आहे. त्याच लाभ आतापर्यंत हजारो जणांनी घेतला आहे. या उपक्रमाचे अपर तहसिलदार गीता गायकवाड यांनी कौतुक केले आहे. तसे, प्रमाणपत्र गायकवाड यांनी सचिन काळभोर यांना दिले आहे.