पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनामुळे शुक्रवारी (दि.3) सात जणांचा मृत्यू झाला. तर, आजही विक्रमी 276 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. कोरोनामुळे मोहनगर, चिंचवड येथील 62 वर्षीय महिलेचा, चिंचवडेनगर येथील 65 वर्षीय पुरूषाचा, भीमनगर, पिंपरी येथील 60 वर्षीय महिलेचा, रिव्हररोड, पिंपरी येथील 67 वर्षीय पुरूषाचा, साईनगर, मामुर्डी येथील, 66 वर्षीय पुरूषाचा, निगडी येथील 80 वर्षीय पुरूषाचा आणि शितळानगर, देहूरोड येथील 58 वर्षीय पुरूषाचा वायसीएम रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण 85 जणांचा मृत्यू झाला आहे.
आज शहरात 232 व शहराबाहेरील 44 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3 हजार 869 झाली आहे. तर, वायसीएम, भोसरी व इतर रूग्णालयात 1 हजार 482 रूग्णावर उपचार सुरू आहेत. एकूण 79 कोरोनाबाधित रूग्ण बरे झाल्याने त्यांना आज रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत 2 हजार 318 जण बरे झाले आहेत.
981 कोरोना संशयितांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर, आज 242 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.अद्याप 2 हजार 159 जणांचे अहवाल येणे बाकी आहे.