- पुण्यातील वृद्धेचा कारोनामुळे मृत्यू, 168 जण बरे झाले
पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या 24 तासांत 314 या विक्रमी संख्येने कोरोनाबाधित गुरूवारी (दि.2) आढळून आले आहेत. हा आतापर्यंतची कोरोनाबाधितांचा सर्वांत मोठा आकडा आहे. पुण्यातील एका वृद्धेचा मृत्यू झाला. तर, 168 जण बरे झाले शहरातील आतापर्यंतचा कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 620 झाली आहे. वायसीएम, भोसरी व इतर रूग्णालयात एकूण 1 हजार 364 जणांवर व पुण्यातील रूग्णालयात 8 जणांवर उपचार सुरू आहेत.
पुण्यातील गोखलेनगर येथील 72 वर्षीय वृद्धेचा पिंपरीतील वायसीएम रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 78 झाली आहे. कोरोनाबाधित 168 जण बरे झाल्याने त्यांना आज रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. बरे होणार्यांची संख्या 2 हजार 154 झाली आहे.
दिवसभरात तब्बल 1 हजार 479 कोरोना संशयितांना वायसीएम, भोसरी व इतर रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर, आज एकूण 1 हजार 19 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 1 हजार 672 जणांचे अहवाल येणे प्रलंबित आहे. एकूण 20 हजार 409 पैकी 15 हजार 246 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर, 455 जणांना क्वारंटाईन करण्यात आले.