पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधित रूग्ण सापडण्याचा वेग अधिक असला तरी, त्यातून ठणठणीत बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे. आज बुधवारी (दि.22) एका दिवसात एकूण 203 कोरोनाबाधित रूग्ण बरे झाले. त्यांना रूग्णालय व कोविड केअर सेंटरमधून डिस्जार्च देण्यात आला.
शहरात एका दिवसात सरासरी 200 ते 400 कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतत आहे. आतापर्यंत तब्बल 8 हजार 651 कोरोनाबाधित रूग्ण बरे झाले आहेत. त्यात एका वर्षांपासून 90 वर्षीय वृद्धांपर्यंतचा समावेश आहे. ही बाब शहरासाठी दिलासादायक आहे.
आज 4 हजार 437 संशयितांच्या घशातील द्रव नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. तर, एकूण 3 हजार 187 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण 62 हजार 525 जणांचे घशातील द्रव नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी आतापर्यंत तब्बल 47 हजार 356 जणांचे अहवाल अहवाल निगेटिव्ह आले आहेत.