पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी (दि.19) कोरोनाबाधित तब्बल 41 रूग्णांचा मृत्यू झाला. ही आतापर्यंतची सर्वांत मोठी संख्या आहे. तर, कोरोना पॉझिटिव्ह 865 रूग्णांची नोंद झाली. भोसरी, चिखली, रावेत, कृष्णानगर, थेरगाव, गांधीनगर, पिंपरी, चिंचवड, तळवडे, बिजलीनगर, काळेवाडी, निगडी, भोसरी, रूपीनगर, सांगवी, दिघी, पिंपळे गुरव, कासारवाडी, चिखली, रहाटणी, फुगेवाडी तसेच शहराबाहेरील चाकण, आंबेठाण, शिरूर, खेड, हिंजवडी येथील रहिवाशी असलेले कोरोनाबाधित 41 रूग्णांचा आज मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण 860 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाबाधितांची एकूण संख्या 38 हजार 218 झाली असून, 6 हजार 137 सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाबाधित 141 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालय व कोविड केअर सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला.
दोन हजार 310 नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. आज 1 हजार 605 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर, अद्याप 2 हजार 863 जणांचे अहवाल येणे बाकी आहे. आतापर्यंत 1 लाख 40 हजार 141 जणांचे स्वॅब घेण्यात आले असून, 99 हजार 562 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.