पिंपरी | निर्भीड सत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना पॉझिटिव्ह 757 रूग्णांची नोंद रविारी (दि.23) झाली. कोरोनाबाधित 792 रूग्ण बरे झाले. तर, उपचारादरम्यान 11 जणांचा मृत्यू झाला.
कोरोनाबाधितांची एकूण संख्या 42 हजार 249 झाली आहे. शहरात सक्रिय 6 हजार 629 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, पुण्यातील रूग्णालयात 113 रूग्ण दाखल आहेत. दिवसभरात 2 हजार 889 नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. तर, 2 हजार 15 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्याप 2 हजार 451 जणांचे अहवाल येणे बाकी आहे. आतापर्यंत एकूण 1 लाख 53 हजार 447 जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 1 लाख 9 हजार 348 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
कोरोनाबाधित 792 रूग्ण बरे झाले. त्यांना रूग्णालय व कोविड केअर सेंटरमधून आज डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण 27 हजार 957 रूग्ण ठणठणीत बरे झाले आहेत.
दरम्यान, काळेवाडी, चिंचवड, थेरगाव, निगडी, सांगवी तसेच, जुन्नर, आंबेगाव, खेड, धानोरी येथील रहिवाशी असलेले 11 रूग्णांचा आज मृत्यू झाला. आतापर्यंत 934 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.