पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरातील 1 हजार 142 जणांची कोरोना पॉझिटिव्ह म्हणून गुरूवारी (दि.27) नोंद झाली. कोरोनाबाधित 727 रूग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर, उपचारादरम्यान 11 रूग्णांचा मृत्यू झाला.
कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या 46 हजार 238 वर पोहचली आहे. सक्रिय 5 हजार 87 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, पुण्यातील रूग्णालयात 135 रूग्ण दाखल आहेत. कोरोनाबाधित 727 रूग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. बरे झालेल्यांची एकूण संख्या 31 हजार 863 इतकी झाली आहे.
दरम्यान, निगडी, भोसरी, पिंपरी, रावेत, मोशी, तळेगाव, सांगवी, दापोडी येथील रहिवाशी असलेले 11 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत 1 हजार 23 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील 3 हजार 683 नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. दोन हजार 401 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. अद्याप 2 हजार 501 जणांचे अहवाल येणे प्रलंबित आहे. आतापर्यंत एकूण 1 लाख 68 हजार 322 पैकी 1 लाख 20 हजार 311 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.