पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाधितांची संख्या गेल्या आठवड्याभरापासून घटत आहे. आजही बाधितांची संख्या कमी झाली आहे. मंगळवारी (दि.29) कोरोना पॉझिटिव्ह 684 रूग्णांची नोंद झाली.
शहरात कोरोना बाधितांची एकूण संख्या 77 हजार 317 वर पोहचली आहे. तर, सक्रिय 4 हजार 683 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यातील रूग्णालयात 631 रूग्ण दाखल आहेत.
तीन हजार 908 नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. तर, 3 हजार 50 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. अद्याप 1 हजार 763 नागरिकांचे अहवाल येणे बाकी आहे.कोरोनाबाधित 806 रूग्ण बरे झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्यांची एकूण संख्या 69 हजार 61 इतकी झाली आहे.
उपचारादरम्यान, आकुर्डी, चिंचवड, वाल्हेकरवाडी, पुनावळे, पिंपळे सौदागर, भोसरी, मोशी, काळेवाडी, पिंपळे गुरव, पिंपरी, सांगवी, विशालनगर येथील रहिवाशी असलेले 16 रूग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 1 हजार 306 रूग्ण मरण पावले आहेत. तर, शहराबाहेरील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. ती संख्या 484 आहे.