पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
शहरात अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. अशा बांधकामांवर कारवाईस न्यायालयाने रविवार (दि.31) पर्यंत तात्पुरती स्थगिती दिली होती. ती मुदत संपल्याने पालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामे, पत्राशेडवर कारवाई सुरू केली जाणार आहे.
कोरोना महामारीमुळे मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत बांधकामांवर तात्पुरती स्थगिती आदेश 22 डिसेंबर 2020 पर्यंत नंतर 31 जानेवारीपर्यंत दिले होती. त्याचा गैरफायदा घेत शहरातील अनेक भागात अधिकृत बांधकामे जोरात सुरू आहेत. महिना दोन महिन्यात दोन ते तीन मजली इमारती बांधल्या जात आहेत. अनेक ठिकाणी पत्राशेड बांधली गेली आहेत. तसेच, प्लॉटींग करून जागा विकल्या जात आहेत. त्यामुळे शहर बकाल होत आहे. त्याचबरोबर अनेकांची आर्थिक फसवणूक होत आहे.
या संदर्भात पालिकेकडे असंख्य तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मात्र, न्यायालयीन स्थगिती असल्याने पालिकेने कारवाई बंद ठेवली होती. मात्र, पालिकेने 300 पेक्षा अधिक जणांवर पोलिसांत गुन्हे दाखल केले आहे. न्यायालयाचा स्थगितीची मुदत संपल्याने पालिकेच्या बांधकाम अतिक्रमण विभागाने कारवाईसाठी कंबर कसली आहे. पोलिस बंदोबस्तात पूर्वीप्रमाणे कारवाई सुरू केली जाणार आहे, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले आहे.