‘निर्धार विजयाचा, संवाद कार्यकर्त्यांचा’ हे ब्रीद वाक्य घेऊन निवडणुकांना सामोरे जाणार
पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी चिंचवडला राष्ट्रवादीचा मेळावा होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या मेळाव्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीकडून जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू आहे. चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाट्यगृहात शनिवारी दुपारी दोन वाजता हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने अजित पवार कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सांगितले, की पालिकेतील भाजपच्या सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराला शहरातील जनता वैतागली आहे. शहराच्या विकासाला गती देण्यासाठी राष्ट्रवादी हाच पर्याय आहे, असे गव्हाणे म्हणाले.