मुंबई | निर्भीडसत्ता न्यूज
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले आहे. त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात विनायक मेटेंचा मृत्यू झाला. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विनायक मेटेंना नवी मुंबई येथील एमजीएम रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाल्याची माहिती आहे. या अपघातामध्ये विनायक मेटेंना गंभीर अवस्थेत कामोठे येथील एमजीएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते.
गंभीर अवस्थेत विनायक मेटे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी याविषयी माहिती दिली आहे. विनायक मेटे आपला एक सहकारी आणि बॉडीगार्ड यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने येत होते. या दरम्यानच हा अपघात झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मराठा आरक्षणासंदर्भातील दुपारी 12 वाजता बैठक होती. यासाठीच ते मुंबईकडे येत होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भाजपचे नेते रुग्णालयाकडे रवाना झाले आहेत.