निर्भीड न्यूज :
स्वातंत्र्यदिना निमित्त कै. हनुमंत तापकीर प्रतिष्ठानच्या वतीने युवा उद्योजक विनोदभाऊ तापकीर यांनी “जिव्हाळा वृक्ष संवर्धन प्रकल्प” म्हणजे “झाडाला मुलाप्रमाणे सांभाळा, झाड तुम्हांला आयुष्यबर सांभाळेल” अशा उद्येशाने सुरु केलेल्या उपक्रमाचा प्रारंभ त्रिरत्न बौद्ध विहार काळेवाडी येथे केला. या मोहिमेला परिसरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला
यावेळी प्रथम बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सर्व नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. नंतर बौद्ध विहार मध्ये वृक्ष लावण्यात आली. तापकीरनगर काळेवाडी प्रभाग क्रमांक ४७ व ४८ मधील नागरिकांच्या घरोघरी जाऊन देशी झाडांचा रोपांचे वाटप करण्यात आले.
विनोद तापकीर यांनी सांगितले की, १५ हजार झाडे लावण्याचा माझा संकल्प आहे. त्यातील ३ हजार झाडे वाटण्यात आली. १०० झाडे लावण्यात आली. या उपक्रमास नागरिक, युवा वर्ग, महिला यांचा सहभाग आहे .आगदी थोड्याच दिवसात माझा संकल्प पुरा करणार आहे
यावेळी दीपक जगताप, राऊत काका, आव्हाळे काका, अरुण बकाल,उपमहापौर मुरलीधर ढगे, युवा नेते किरण नढे, युवराज दाखले, बाबासाहेब जगताप, अभिषेक वाळके, अतुल नढे, अनिल क्षीरसागर, प्रकाश अंकुश , किशोर शिंदे, हरेश अमोल देवकर, निखिल जाधव, राज तापकीर, निलेशभाऊ तापकीर व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.