पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फॉउंडेशन संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल रहाटणी येथे ”भारतीय संविधान दिन” साजरा करण्यात आला. शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत व संदीप हिवाळे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व सामूहिक उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, पीसीएमसी शाळेतील शिक्षिका पूनम कोलते मॅडम व शिक्षक वृन्द उपस्थित होते.
या वेळी स्कूल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक – विमल गार्डन – कोकणे चौक स्कूल अशी संविधान दिंडी काढण्यात आली. यामध्ये इयत्ता पहिली ते दहावीचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते व दिंडीतील विद्यार्थ्यांच्या घोषणांनी सर्वत्र रोडे परिसर दुमदुमून गेला.
तसेच शाळेतील शिक्षिका सोनाली पाटील मॅडम श्वेता भालेराव मॅडम अनिता रोडे मॅडम यांनी मराठी हिंदी इंग्लिश संविधानाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली नववी, आठवी, व सातवीचे विद्यार्थी यांनी अर्पिता तिवारी सोहम गायकवाड स्वराली शिंदे यांनी बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान याबद्दल माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबीता पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन लुंबिनी मालगे यांनी केले.