पिेंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी चिंचवड शहर जिल्हा चिटणीस पदी निगडी येथील सचिन काळभोर यांची निवड करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी या निवडीबाबतचे पत्र दिले आहे.
भाजपचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, सरचिटणीस नामदेव ढाके तसेच इतर मान्यवर या वेळी उपस्थित होते.
काळभोर हे गेली अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. पक्षवाढीसाठी त्यांनी सामाजिक, शेक्षणिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रात उपक्रम राबिवले आहेत. त्यांच्या या निवडीमुळे परिसरातील सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.