पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाची अतिरिक्त जबाबदारी पशूवैद्यकीय विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तसेच, कामगार कल्याण विभागही त्यांच्याकडे असणार आहे. तसेच, भूमि आणि जिंदगी, विशेष नियोजन प्राधिकरण विभागाची अतिरिक्त जबाबदारी निवडणूक विभागाचे उपायुक्त अविनाश शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे.
आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांची ग्रामविकास विभागात उपसचिव म्हणून बदली झाली आहे. तर, भूमि आणि जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त विजयकुमार सरनाईक यांची सहा महिन्यांतच पुन्हा तळेगाव नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून बदली झाली. त्यामुळे वरील विभागांला आठवडाभर कोणी प्रमुख नव्हता. त्यामुळे त्या विभागांचे कामकाज ठप्प झाले होते. अखेर, आयुक्त शेखर सिंह यांनी त्या चार विभागांसाठी अधिकारी नेमला आहे.