निर्भीडसत्ता न्यूज –
रिपब्लिकन वाहतूक आघाडी संघटनेच्या वतीने खराळवाडी, नेहरुनगरमधील महिलांना उज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस कनेक्शन आणि प्रशिक्षण देण्यात आले.
माजी सहायक पोलीस आयुक्त मोहन विधाते, ईम्रान अत्तार, सलिम शेख आदी उपस्थित होते
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी उज्वला गॅस योजना देशभर राबविण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी प्रयत्न सुरु केले आसल्याची माहिती रिपब्लिकन वाहतूक आघाडी संघटनेचे अध्यक्ष अजीज शेख यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर कार्यालय सुरु करण्यात आले आहे.
खराळवाडी, नेहरुनगर भागातील महिलांना गॅस कनेक्शन तसेच मार्गदर्शन या वेळी करण्यात आले.